पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात पारंपरीक वाद्य असलेला ढोल वाजवला. ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या वेळी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, कर्नाटक सरकारने सुशासन आणि समरसतेचा मार्ग निवडला आहे. जो भगवान बसवेश्वरांनी शतकांपूर्वी देश आणि जगाला दिला होता. भगवान बसवेश्वरांनी अनुभव मंडपम सारख्या मंचाद्वारे जगाला सामाजिक न्याय आणि लोकशाहीचा आदर्श दिला. समाजातील प्रत्येक भेदभावाच्या वर उठून सर्वांना सक्षम करण्याचा मार्ग त्यांनी दाखवला.
ट्विट
#WATCH | Karnataka: PM Narendra Modi plays traditional drum during a public rally in Kalaburagi district pic.twitter.com/vyfgKAVQnO
— ANI (@ANI) January 19, 2023