पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इन्स्टाग्रावरील फॉलोअर्सची संख्या 30 दशलक्षच्या घरात
PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या इन्स्टाग्रामवरील (Instagram) फोलोअर्सची संख्या 30 दशलक्षच्या घरात रविवारी (13 ऑक्टोंबर) पोहचली आहे. तर मोदी हे इन्स्टाग्रावरील अशी एक राजकीय व्यक्ती आहे ज्यांना प्रचंड लोक फॉलो करतात. तर गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी यांच्या फोलोअर्सच्या संख्येत दिवसागणिक अधिक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे 25.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 5 वर्षातील कार्यकाळ पाहिल्यास त्यांनी नव्या भारतासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. तसेच काही दिवसांपूर्वी अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या हाउडी मोदी या कार्यक्रमामधून त्यांनी भारताच्या नव्या संकल्पने विषयीचा मुद्दा स्पष्ट केला. मोदी यांच्या या कार्यक्रमामुळे भारतीय वंशाचे अमेरिकेतील राहिवासी अधिक प्रोत्साहित झाले होते.

तर अमित मालविव्हा यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 दशलक्षचा आकडा इन्स्टाग्रावर पार केला आहे. एवढेच नाही तर तरुणांमध्ये मोदी यांच्या फोलोअर्सची संख्या प्रचंड आहे. आतापर्यंत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इन्स्टाग्रावर 30 दशलक्ष फोलोअर्सचा आकडा पार केला होता.(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपुरम च्या समुद्र किना-यावर अथांग सागराला उद्देशून लिहिली एक भावपूर्ण कविता)

तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचे 24.8 दशलक्ष फोलोअर्सची संख्या इन्स्टाग्रावर आहे. परंतु नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटर आणि फेसबुकवर सर्वाधिक फोलोअर्सची संख्या असलेले राजकीय नेते आहेत. तर ट्वीटरवर मोदी यांचे जवळजवळ 50 लशलक्ष आणि फेसबूकवर 44 दशलक्ष फोलोअर्सची त्यांना फॉलो करतात. नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये त्यांचे सरकार निवडून आल्यानंतर त्यांनी स्वत: बद्दल अधिक महिती, अपडेट आणि त्यांच्या दैनंदिन कार्याबद्दल नेहमीच माहिती मिळावी यासाठी नमो अॅप लॉन्च केले होते.