गांधी परिवाराकडून SPG सुरक्षा काढून घेतल्यानंतर काँग्रेस संतप्त, भाजपकडून वैयक्तिक सूड घेतला जात असल्याची टीका
Priyanka Gandhi & Rahul Gandhi | (Photo Credit: PTI)

केंद्रात असलेल्या मोदी सरकारने सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi-Vadra) यांना देण्यात आलेली एसपीजी (SPG) सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला असून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. पक्षाने मोदी सरकार वैयक्तिक सूड घेत असल्याचा आरोप लगावला आहे. गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी याबाबत ट्वीट करत आपले मत मांडले आहे.

अहमद पटेल यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, यापूर्वीचे दोन माजी पंतप्रधान ज्यांनी दहशतवाद आणि हिंसेच्या विरोधात महत्वाची पावले उचलली आहेत त्यांच्याच परिवारातील सदस्यांच्या आयुष्यासोबत गैरवर्तवणूक केली जात आहे. तर नुकत्याच सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडून सुद्धा एसपीजी सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडून एसपीजी सुरक्षा काढून टाकल्यानंतर आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही सुरक्षा आहे.(Rahul Gandhi चं नाव घेणं टाळलं आणि मग त्यांना गमवावे लागले लाखो रुपये; वाचा सविस्तर)

अहमद पटेल ट्वीट:

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीची स्थापना 988 मध्ये संसदेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या कायद्याअंतर्गत झाली होती. पंतप्रधान यांच्या सोबत माजी पंतप्रधान आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात येते. मोदी सरकारने गांधी परिवाराकडून एसपीजी सुरक्षा काढून टाकल्यानंतर त्यांना आता Z+सुरक्षा देण्यात येणार आहे.