'कौन बनेगा करोडपती'. एक असा मंच जिथे कितीतरी सामान्य परिस्थितीच्या व्यक्तींनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली स्वप्न या ठिकाणी पूर्णत्वाला नेली आहेत. पण काहींच्या बाबतीत मात्र हे तितकंसं खरं होत नाही. अर्थात त्यासाठी ती व्यक्तीच जबाबदार असते. काही वेळा साध्या प्रश्नांची उत्तरं चुकीची देऊन कमावलेली रक्कम स्पर्धक गमावत असतात. तर कधी कधी प्रश्नच कठीण विचारला जातो. पण अशा वेळी डाव सोडायचा निर्णय न घेता स्पर्धक खेळ चालूच ठेवतात आणि मग बऱ्याचदा मिळवलेल्या रक्कमेतून बरीच रक्कम वजा होऊन शेवटी हातात पडते. असंच काहीसं नुकतंच मथुरेच्या कुमार यांच्या सोबत घडलं. राहुल गांधींचं (Rahul Gandhi) नाव घेणं त्यांनी टाळलं आणि त्यांना लाखो रुपये गमवावे लागले.
कुमार 11 व्या प्रश्नापर्यंत म्हणजेच 6,40,000 रक्कमेपर्यंत पोचले होते. अमिताभ यांनी त्यांना 12,50,000 साठीचा 12 वा प्रश्न विचारला,''17 व्या लोक सभेच्या खालीलपैकी कोणत्या सदस्याकडे 'ऐकिडो' या जपानच्या मार्शल आर्टस् चा ब्लॅक बेल्ट आहे?'' पर्याय होते गौतम गंभीर, राहुल गांधी, तेजस्वी सूर्या आणि अनुराग ठाकूर. कुमार यांना उत्तर माहित नव्हते. त्यांनी तरीही भाजपच्या तेजस्वी सूर्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करायला सांगितले. पण हा उत्तर चुकीचे होते. ह्याचे बरोबर उत्तर होते, राहुल गांधी. (हेही वाचा. KBC 11: सुनीता कृष्णन यांच्यावर 8 जणांनी केला होता सामूहिक बलात्कार तर 17 वेळा करण्यात आला जीवघेणा हल्ला; वाचा संपूर्ण कहाणी)
याबद्दल वाईट वाटलेल्या तेजस्वी सूर्या यांनी ट्विटरवर काहीशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा तेजस्वी सूर्या यांचे ट्विट:
Bro. I feel so bad for you.
I wish I was indeed a black belt in Aikido. You would have been a richer man today. :) pic.twitter.com/Tz1TSaRcX2
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) १ नोव्हेंबर, २०१९
काँग्रेसचे राहुल गांधी हे फक्त ऐकिडो मध्येच ब्लॅक बेल्ट नसून, ते एक राष्ट्रीय नेमबाजी विजेता सुद्धा आहेत.