अमिताभ बच्चन यांचा केबीसी हा शो कायमच स्पर्धकांच्या अनोख्या लाइफस्टरींमुळे प्रसिद्ध राहिला आहे. अशाच एका स्पर्धकाच्या आयुष्यतील एक हादरून टाकणारा प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे, तो म्हणजे समाजसेविका सुनीता कृष्णन.
सुनीता 'प्रज्ज्वला' या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत व नुकतीच त्यांनी केबीसी शोमधील 'कर्मवीर' या भागाला स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडिया वर वायरल होत आहे.
शोमध्ये अमिताभ यांच्याशी गप्पा मारताना सुनीता यांनी त्यांच्या जीवनातील एक असा प्रसंग सांगितला ज्यामुळे खुद्द बिग बी सुद्धा काही काळ निशब्द झाले.
वयाच्या अवघ्या 15 व्य वर्षी सुनीता यांच्यावर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर आजवर 17 वेळा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील करण्यात आला आहे. हे सगळं ऐकून अमिताभ यांना धक्का बसला आणि ते शांत झाले. सुनीता म्हणाल्या '15 वर्षाची असताना माझ्यावर 8 लोकांनी बलात्कार केला होता. महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्तता करत असताना आतापर्यंत माझ्यावर 17 वेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र मी मृत्युला अजिबात घाबरत नाही. जोपर्यंत माझा श्वास सुरू असेल, तोपर्यंत वेश्या व्यवसायातून महिलांची मुक्तता मी करताच राहीन".
धक्कादायक! पतीने केले पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीच्या गुप्तांगाचे केले तुकडे
सुनीता या महिलांची होणारी तस्करी, लैंगिक शोषण आणि त्यांच्यावरील अत्याचार हे रोखण्याचं काम त्यांच्या संस्थेमार्फत करतात. आजवर त्यांनी 22 हजार तरुणी तसेच महिलांची लैंगिक शोषणातून मुक्तता केली आहे. याच कार्याची दाखल घेत केंद्र सरकारने त्यांना 2016 साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.