पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी तिच्या पतीने त्या व्यक्तीच्या गुप्तांगाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना युक्रेनच्या (Ukraine) खारकिव येथे घडली. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेच्या पतीला अटक केली असून अधिक तपास करीत आहेत. या घटनेने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 27 वर्षांचा दिमित्री स्पास्किन त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच पीडित महिलेसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. रात्री 1 च्या सुमारास हे दोघेही त्या हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने रस्त्यात एका दिमित्री इनचेन्को या इसमाने गाठले. आणि त्याने स्पास्किनच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर झालेल्या बाचाबाचीत स्पास्किनचा डोळा चुकवून त्याने स्पास्किनच्या पत्नीचा चेहरा झाकून तिला झुडूपात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करु लागला. हा संपुर्ण प्रकार त्यांचा पाठलाग करत येत असलेल्या स्पास्किनने पाहिला. त्याने त्या आरोपीला रोखत त्यानं त्याच्याकडे असलेल्या स्विस चाकूने इनचेन्कोच्या गुप्तांगावर वार करत त्याचे तुकडे केले.
हेदेखील वाचा- लज्जास्पद! पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके
इनचेन्कोने माझ्या पत्नीचा गळा धरला होता आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती स्पास्किनने पोलिसांना दिली. गुप्तांगावर वार होताचा इनचेन्को किंचाळला. त्याच्या आवाजाने जवळपासच्या परिसरातील लोकांनी पोलिसांना फोन लावला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन इनचेन्कोला रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी स्पास्किनला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.