
माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील रतलाममध्ये मध्ये घडली आहे. येथे एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर तिच्या पहिल्या पतीसह त्याच्या साथीदारांनी मिळून सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपींनी या महिलेच्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके देऊन विष देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केल्याचा पोलीस तपासात उघड झाले आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला रस्त्यावर सापडली असून अत्यावस्थ स्थितीत असल्यानं तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार महिन्याभराआधी तिला तिच्या पहिल्या पतीन तलाक दिला होता. त्यानंतर महिलेनं दुसरं लग्न केलं. आरोपीने पीडितेच्या दुस-या नवऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचा साक्षीदार पीडित असल्यानं हे प्रकरण पोलिसात न नेण्यावरून पीडितेला धमक्या आणि त्रास दिला जात होता. मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना सांगणार यावर ठाम राहिलेल्या पीडितेला धडा शिकवण्यासाठी हा आरोपी संधी शोधू लागला. हेदेखील वाचा-
सोलापूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार, निर्मनुष्य स्थळी नेऊन वारंवार केला तिच्यावर बलात्कार
7 ऑक्टोबरला पीडित महिला कपडे शिवण्यासाठी जात असताना रस्त्यात पहिल्या नवऱ्यानं आपली बहिण आणि दोन भाच्यांच्या मदतीनं पीडितेचं अपहण केलं. त्यानंतर पीडितेला त्यांच्या शेतात घेऊन जाण्यात आलं. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी दारू पार्टी केली आणि त्यानंतर पीडितेवर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. पीडितेनं पोलिसात जावू नये तिने जबाब बदलावा यासाठी तिचा छळ करण्यात आला. पीडित महिला तिच्या निर्णयावर ठाम राहिल्यानं तिच्या गुप्तांगावर सिगरेटचे चटके देण्यात आले. पहिल्या नवऱ्याला राग अनावर झाल्यानं त्याने पीडितेला जबरदस्ती किटकनाशक पाजून रस्त्यावर फेकून देण्यात आली आणि त्यानंतर आरोपी फरार झाले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या नराधमांना अटक करण्यात आली असून
पोलीस अधिक तपास करत आहेत.