Representational Image (Photo Credits: PTI)

एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील डोणज (Donaj) येथे घडली आहे. यात मुलीला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेने या परिसरातील गावक-यांकडून तसेच पीडित मुलीच्या कुटूंबियांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणी आरोप रामणणा केदार या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

शाळकरी मुलगी (वय 15) ही शाळेतून घरी जात असताना रामणणा केदार या आरोपीने तिच्या पाठीमागून टॉवेल टाकून तिला शेतातील ऊसामधे ओढत नेलं. तिने विरोध केल्यामुळे तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच तेथे तिच्यावर रामणणा ने वारंवार बलात्कार केला. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला लागताच त्यांनी ताबडतोब पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.  हेदेखील वाचा- पिंपरी: तरुणीला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल

पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी रामणणा शिवशंकर केदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून 26 सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असताना याबाबत कायदा अधिक कडक करण्यात यावा अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. त्या दिशेने सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात येत आहे.