पिंपरी: तरुणीला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पिंपरी (Pimpari) येथे एका तरुणीला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात तीन नराधमांनी तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तसेच 21 वर्षीय तरुणाने याबाबत पोलिसात धाव घेत या प्रकरणाची अधिक माहिती दिली आहे.

पीडित तरुणी ही निगडी येथील टिळक चौकाच्या परिसरातून जात होती. त्यावेळी तिला तीन जणांनी वाटेत अडवत तिच्यावर एक स्प्रे मारल्यानंतर तिच्या तोंडाला रुमाल बांधत घेऊन गेले. या तीन नराधमांनी तिला रिक्षामधून एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तर कोणाला संशय येऊ नये म्हणून पीडित तरुणीवर एका अज्ञात ठिकाणी नेणे योग्य वाटल्याने तेथेच तिच्यावर बलात्कार करण्यात आला.(मुंबई: सामूहिक बलात्कार पीडितेचा मृतदेह दोन दिवसांपासून शवाघरात, आरोपींना अटक झाल्यावरच पोस्टमार्टम करण्याचा कुटुंबाचा निर्धार)

आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र एका तरुणाने घडलेल्या प्रकाराची फिर्याद पोलिसात दिली आहे. तर अज्ञात आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींना लवकरच कैद केले जाईल असे सांगण्यात आले आहे.