लोकसभा निवडणुकीनंतर, अलीकडेच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी व चर्चासत्र ओम बिरला (Om Birla) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले . यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभाराचे भाषण केले. यावेळी मोदींनी पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणाऱ्या खासदारांसह सर्वांचे स्वागत केले. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) व भाजपाच्या डॉ. हिना गावित (Dr. Hina Gavit) यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी भाषणात मांडलेल्या मुद्द्यांचे मोदींनी खास कौतुक केले. अमोल कोल्हे हे यंदा शिरूर मतदारसंघातून पहिल्यांदाच संसदेची पायरी चढले आहेत आणि तरीही त्यांनी अतिशय प्रभावशाली मुद्दे मांडले होते, त्यांच्या ओघवत्या शैलीची स्तुती करत मोदींनी स्वतःच्या "विरोधक सुद्धा महत्वाचे आहेत" या विधानाची सार्थ पटवून दिली.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या अवस्थांचा प्रश्न उभारून रायगडाला पुन्हा एकदा राजधानीचा मान मिळावा अशी मागणी केली होती. तर हिना गावित यांनी आदिवासी विकास संदर्भात मुद्दे मांडले होते. यांची भाषणे ऐकल्यावर आता मी काय बोलू असा प्रश्न मला पडला आहे असे म्हणत मोदींनी या दोघांचे कौतुक केले होते. डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका सुरू राहणार
पहा काय म्हणाले होते डॉ. अमोल कोल्हे
मोदींनी आपल्या भाषणातून खासदार असुदुद्दीन औवेसी यांच्यासह सभागृहातील अन्य खासदारांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत त्यांचे कौतुक केले. तसेच देशातील 130 कोटी जनतेनं पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताच्या सरकारची निवड केली आहे. पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला सार्थक बनवण्यासाठी सर्वांनी काम करायचं आहे, असेही मोदींनी म्हटले.
नरेंद्र मोदी यांनी केले आभार प्रदर्शन
तत्पूर्वी नरेंद्र मोदींनी काल आपल्या भाषणातून काँग्रेसचा मात्र मात्र पुरता समाचार घेतला होता. आणीबाणीवरुन काँग्रेसला लक्ष्य करत आणीबाणीचा डाग कदापी पुसला जाणार नाही, लोकशाही या देशाचा आत्मा आहे आणि त्याचे महत्व पटवून देण्यासाठी लोकशाहीवरील प्रहार लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.