डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका सुरू राहणार
Dr. Amol Kolhe | (Photo Credit : Facebook)

Lok Sabha Election 2019:  डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)  निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अमोल कोल्हे यांची रसिकांमधील लोकप्रियता मतांमध्ये बदलू शकते का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र सध्या त्यांची मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sanbhaji) टेलिव्हिजनवर सुरू असल्याने ही आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र आज निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत डॉ. कोल्हेंना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका टेलिव्हिजनवर सुरूच राहील असा निर्णय आक निवडणूक आयोगाने दिला आहे. शासकीय वाहिन्या वगळून खासगी वाहिन्यांवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या मालिका दाखवता येऊ शकतात अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुले कोल्हेंसोबतच अनेक उमेदवार अभिनेत्यांच्या मालिका सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आचासंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक cVIGIL अ‍ॅप लॉन्च केले आहे. याद्वारा कोणीही व्यक्ती तक्रार करू शकते. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर 100 मिनिटातत्याची दखल घेतली जाणार आहे.