काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची ट्विटरवर एण्ट्री, पाहा कोणाला करतात फॉलो
Priyanka Gandhi Vadra Is Now On Twitter | (Photo credit: archived, edited, representative image)

Priyanka Gandhi Vadra Is Now On Twitter: काँग्रेस पक्ष सरचिटणीस (Congress General Secretary) पदाची सूत्रे हातात घेऊन प्रत्यक्ष राजकारणात प्रवेशकर्त्या झालेल्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) आता हळहळू सक्रियही होऊ लागल्या आहेत. या सक्रियतेची सुरुवात प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ शहरापासून करत आहेत. लखनऊ शहरात त्या रोड शो करणार आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष राजकारणाचा श्रीगणेशा करण्यापूर्वी प्रिंयका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावरही जोरदार पदार्पण केले आहे. काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवरील एण्ट्रीची माहिती आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करुन दिली. 'प्रियंका गांधी वाड्रा आता ट्विटरवरही आहेत. आपण त्यांना @priyankagandhi वर फॉलो करु शकता', असे या ट्विटरमध्ये म्हटले आहे. प्रयंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची सूत्रे हाता घेत प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांचा पक्षप्रवेश हा केवळ नाममात्रच होता. मात्र, आता प्रियंका गांधी यांनी हळूहळू राजकारणात थेट सक्रिय होत आहे.

दरम्यान, ट्विटरवर नुकत्याच आलेल्या प्रियंका गांधी यांनी अद्याप एकही ट्विट केले नहाी. परंतू, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मात्र मिनिटामिनिटाला वाढतच आहे. ट्विटरवर एण्ट्री घेताच त्यांनी सर्वप्रथम आपले बंधू राहुल गांधी यांना फॉलो केले. त्यानंतर त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सिंह सुरजेवाला, अहमद पटेल, काँग्रेस, अशोक गेहलोथ आणि सचिन पायलट यांनाही फॉलो केले. (हेही वाचा, बहीण प्रियंका गांधी यांना बंधू राहुल गांधी देणार गिफ्ट; लोकसभा निवडणुकीत घडणार चमत्कार?)

Priyanka Gandhi Vadra Is Now On Twitter | (Photo credit: archived, edited, representative image)

उत्तर प्रदेश येथील रोड शो हा प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारण प्रवेशनंतरचा पहिलाच रोड शो आहे. त्यामुळे त्यांच्या रोडशोबद्दल काँग्रेस कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमे अशा सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेश आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काँग्रेसचे हे दोन सरचिटणीस 12,13 आणि 14 फेब्रुवारीला लखनऊ येथून काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. प्रियंका पूर्व उत्तर प्रदेशमधून 42 आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून सिंधिया 38 जागा सांभाळतील.