G Parameshwara (Photo Credits-ANI)

कर्नाटक (Karnataka) जेडीएस (JDS) आणि काँग्रेस (Congress) सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मात्र आता कर्नाटक उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर (G Parameshwara) यांनी मी दलित (Dalit) असल्यामुळे तीन वेळा मुख्यमंत्री पदासाठी नाकारले असल्याचे म्हटले आहे.

रविवारी दावणगेरे येथील एका कार्यक्रमाच्या आयोजनावेळी जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्री पदासाठी फक्त दलित असल्याने रोखल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बसवलिंगप्पा,के.एच, रंगनाथ आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी निवड कधीच करण्यात आली नाही. परंतु काही संघर्ष केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पद आपल्याकडे सोपवण्यात आले असल्याचे जी. परमेश्वर यांनी म्हटले आहे. येथील राजकरणात दलित नेत्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे सरकारमध्ये ही दलितांवरुन जातिभाव होत असल्याचे परमेश्वर यांनी वक्तव्य केले आहे.

कर्नाटकात एका बाजूस मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील जागावाटपावरुन काँग्रेस-जेडीएस महाआघाडीत वाद सुरु आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी असे वक्तव्य केल्याने काँग्रेससाठी हे अधिकच महागात पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.