अल्ताफ बुखारी (Photo Credits-ANI)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 हटवल्यानंतर राजकरण शांत झाले होते. मात्र आता पुन्हा राजकरणाचे वातावरण निर्माण झाले असून राज्याचे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपी (PDP) सोडून सय्यद अल्ताफ बुखारी (Syed Altaf Bukhari) यांनी स्वत: चा पक्ष स्थापन केला आहे. 'अपनी पार्टी' (Apni Party) असे अल्ताफ बुखारी यांच्या पक्षाचे नाव आहे. पक्षाची स्थापना करताना बुखारी यांनी असे म्हटले आहे की, हा एक आनंदाचा क्षण आहे की आम्ही अखेर पक्षाची स्थापना केली आहे. तर या पार्टीला 'अपनी पार्टी' नावाचे ओखळले जाणार आहे. तसेच आमच्यावर खुप जबाबदाऱ्या असून येथे आशा आणि आव्हाने अधिक आहेत. जम्मू-कश्मीर मधील नागरिकांना विश्वास देतो की, माझी इच्छाशक्ती अधिक मजबूत आहे.

अल्ताफ बुखारी हे महबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीचे माजी नेते आहेत. तर आज श्रीनगर येथे अल्ताफ यांनी अपनी पार्टी पक्षाची स्थापना करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच बुखारी यांनी मुफ्ती यांच्या सरकारवेळी कृषि मंत्री पदाचा कारभार सांभाळला आहे. बुखारी यांचे असे म्हणणे आहे की, राज्यातील सामान्य नागरिकांसाठी आमचा पक्ष काम करणार आहे. माजी मंत्री आणि डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष गुलाम हसन मीर, पीडीपीचे माची आमदार दिलावर मीर, नूर मोहम्मद शेख, अशरप मीर आणी माजी काँग्रेस आमदार फारुक अंबाद्रीयांच्यासह अन्य नेत्यांनी सुद्धा अल्ताफ यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.(जम्मू कश्मीर च्या विभाजनानंतर दार्जिलिंग देखील पश्चिम बंगाल पासून वेगळं करण्यासाठी मागणी)

तर 5 ऑगस्टनंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिली राजकीय हालचाल आहे. त्या दिवशी, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा रद्द करत जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन राज्यांना केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याची घोषणा केली होती.मेहबूबा मुफ्ती यांच्यापासून दूर होण्यापर्यंत बुखारी हे पीडीपीमध्ये होते. भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर जून 2018 मध्ये मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार अल्पसंख्याक बनले. पीडीपीच्या कामकाजावर मेहबुबा आणि बुखारी यांचे मतभेद होते. अल्ताफ यांनी नवीन पक्षाची घोषणा अशा वेळी केली गेली आहे, जेव्हा पारंपरिक काश्मीर आधारित राजकीय पक्षांचे शीर्ष नेतृत्व करणारे फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना सार्वजनिक सुरक्षा अधिनियम (पीएसए) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.