निवडणुकीपूर्वी EVM, VVPAT बनविणाऱ्या ECIL कंपनीला कोट्यावधीचा फायदा
EVM & VVPAT | (Photo courtesy: archived, edited, Symbolic images)

देशात निवडणुकीसाठी इलेक्ट्रिक वोटींग मशीन (Electronic Voting Machine) वापरणे बंद करुन त्या ऐवजी पुन्ही पुन्हा एकदा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची पद्धत अवलंबावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे विरोधक करत आहेत. EVM हॅकरता येऊ शकते येथपासून ते EVM घोटाळा झाला असल्यापर्यंतचे अनेक आरोप करण्यात आले. तरीही निवडणूक आयोग (Election Commission Of India) आपल्या स्वतंत्र भूमिकेवर ठाम राहिला. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसाठी EVM प्रणालीच वापरण्याचा निर्णय कायम ठेवला. पण, तुम्हाला माहिती आहे काय निवडणुकीपूर्वी EVM बनविणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) कंपनीला प्रतिवर्ष किती फायदा होतो. ECIL कंपनीने आपल्या 53 वर्षांच्या इतिहास यंदा सर्वाधिक उत्पन्न कमाविण्याचा विक्रम केला आहे.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, EVM आणि वीवीपॅट (VVPAT) ऑर्डरसोबतच आता जुन्या-पुरान्या EVM लॉटचे M-3 व्हर्जन बदलण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ECIL कंपनीला चांगलेच उत्पन्न मिळणार आहे. ECIL कंपनीला 2017-18 या कालावधीत कंपनीचे उत्पन्न सुमारे 1,275 रुपये इतके होते. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारतीय निवडणूक आयोग ECIL कंपनीला 1,800 कोटी EVM आणि VVPAT ची ऑर्डर देणार आहे. ज्यामुळे ECIL कंपनीच्या उत्पादनात 2,400 कोटी रुपयांची वाढ होऊ शकते.

ECIL ही कंपनी लष्करासाठी इलेक्ट्रिक फ्यूज, लीगेसी मिलिट्री रेडिओ, जॅमर्स आणि अण्वस्त्र पॉवर प्लांट (Nuclear Power Plant) साठी लागणारे पॅसीव ऑटोकैटेलिक रिकंबाइनर डिव्हाईस (Passive autocatellic reencurrent device) बनवते. ECIL चा 2017-18 या वर्षातील अहवाल सांगतो की, कंपनीने अण्वस्त्र उर्जा विभागाच्या सन 2018-19 साठी एक एमओयू स्वाक्षरी केली आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात आणकी भर पडून ते 1,800 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. (हेही वाचा, खळबळजनक दावा: गोपीनाथ मुंडे यांचा झाला होता खून; 2014 च्या निवडणुकीवेळी EVM च्या हॅकिंगची होती कल्पना)

दरम्या, ECIL कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्हाला EVM आणि VVPAT बनविण्याची ऑर्डर भेटली आहे. या वर्षी आमचे वार्षिक उत्पन्न 2,600 कोटी रुपयांवर पोहोचेल. जुन्या मशीन बदलण्यात येत आहेत. त्यामुळे त्यातूनही आमचे उत्पन्न वाढेन. बंगळुरु येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ही कंपनीही EVM आणि VVPAT बनवते. तेलंगणा येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत BEL कंपनीने तयार केलेल्या EVM चा वापर करण्यात आला होता.