17 व्या लोकसभा अधिवेशनाला आज (17 जून) रोजी सुरुवात झाली. लोकसभेच्या आजच्या विशेष सत्रात नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली. आज पहिल्या दिवशी विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या भाषेत शपथ घेतली.
भाजपच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेतून शपथ घेतली. तर शिवसेने सह इतर पक्षांच्या खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. डॉ. अमोल कोल्हे, मनोज कोटक, विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर, प्रितम मुंडे, सदाशिव लोखंडे, नवनीत कौर राणा, इम्तियाज जलील, श्रीरंग बारणे यांच्यासह अन्य खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.
पूनम महाजन, सुप्रिया सुळे, गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे, उदयनराजे भोसले ह्यांनी इंग्रजीमधून तर उन्मेश पाटील, सुनील मेंढे यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.
महाराष्ट्रात चार टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीचा निकाल 23 मे रोजी लागला. त्यात निवडून आलेल्या खासदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला.dr