BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकसभा निवडणुकीसोबतच (Lok Sabha Election) अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) विधानसभेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे.  अरुणाचलमध्ये विधानसभेच्या (Arunachal Pradesh Election) एकूण 60 जागा असून यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 जूनला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Arunachal Pradesh Assembly Election) अरुणाचलमध्ये भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह इतर 3 उमेदवारांचा समावेश आहे.   भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजूजू (Kiran Rijiju) यांनी X वर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या या निकालावरून देशाचा मूड लक्षात येतो, असं रिजूजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी; 26 एप्रिलला मतदान)

अरुणाचलमध्ये  5 जागांवरील भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालं आहे. विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांचा समावेश आहे. त्याचसोबत राटू टेकी, जिक्की टाको, न्यातो दुकोम आणि मुटकू मिथी यांचा समावेश आहे.  विधानसभा निवडणुकीत अरुणाचलमध्ये एनडीएला तब्बल 41 जागांवर विजय मिळला होता. तर जनता दल युनायटेड पक्ष 7 जागा, नॅशनल पीपल्स पार्टी 5 जागा, काँग्रेसला 4 जागा आणि अरुणाचल प्रदेश पार्टी फक्त 1 जागेवरच विजय मिळवता आला होता.

दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांच्या खांद्यावर भाजपने अरुणाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.