PepsiCo India New CEO: पेप्सिको इंडियाकडून जागृत कोटेचा यांची भारताचे नवीन CEO म्हणून नियुक्ती
Jagurt Kotecha (फोटो सौजन्य - X/@UpendrraRai)

PepsiCo India New CEO: अहमद अल शेख यांच्यानंतर पेप्सिको इंडियासाठी नवीन सीईओ म्हणून पेप्सिकोने जागृत कोटेचा (Jagrut Kotecha) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया (AMESA) मध्ये PepsiCo चे मुख्य व्यावसायिक अधिकारी म्हणून काम करत असलेले, कोटेचा मार्च 2024 मध्ये PepsiCo India चे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अहमद अल शेख यांनी पेप्सिको इंडियाच्या सीईओच्या भूमिकेतून पुढे जाऊन कंपनीतील मिडल इस्ट बिझनेस युनिटसाठी सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

कोटेचा भारतातील पेप्सिकोच्या ऑपरेशन्समध्ये प्रमुख भूमिका बजावण्यासाठी तयार आहे. कोटेचा यांच्याकडे पेप्सिकोच्या धोरणात्मक उपक्रमांचे आणि भारताच्या गतिशील बाजारपेठेतील व्यवसाय वाढीचे काम सोपवले जाईल. कोटेचा यांनी सांगितले की, गेल्या 30 वर्षांपासून पेप्सिको कुटुंबाचा भाग असल्याने मी पेप्सिको इंडियाची उत्कृष्टता आणि नवोन्मेषाची अटळ बांधिलकी पाहिली आहे. मी ही नवीन जबाबदारी स्वीकारत असताना भारतीय बाजारपेठेत यशासह वाढ सुनिश्चित करून आमचे ध्येय पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे. (हेही वाचा - गुजरात मध्ये चार शेतकऱ्यांवर दीड कोटींचं संकट, Pepsico ने केला अवैध लागवडीचा आरोप)

पेप्सिकोच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'पेप्सिकोसाठी भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. आमच्या जागतिक धोरणात भारत महत्त्वाची भूमिका बजावतो. गेल्या सहा वर्षांमध्ये, अहमदने आमच्या व्यवसायात बदल घडवून आणण्यात, नाविन्यपूर्ण कार्ये राबवण्यात आणि आव्हानात्मक लँडस्केपमधून संघाचे नेतृत्व करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

तथापी, 1994 मध्ये कंपनीत रुजू झालेल्या कोटेचा यांना विक्री आणि ब्रँड मॅनेजर म्हणून काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी एंड-टू-एंड नफा आणि तोटा (P&L) जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी 2018 मध्ये पेप्सिको इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. तसेच कंपनीच्या उत्पादनांच्या नावीन्यपूर्ण आणि परिवर्तन प्रक्रियेवर देखरेख केली. यूएस कंपनी पेप्सिकोने हैदराबादमधील जागतिक व्यवसाय सेवा केंद्राचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 250 ते 4,000 कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.