Harvesting of potatoes | Representational Image | (Photo Credit: Maxpixel, CC0)

Mumbai, 26 एप्रिल: (Pepsico) पेप्सिको कंपनीने गुजरात (Gujrat)  मधील चार शेतकऱ्यांवर करोडो रुपयांचा दंड लावत, लेस (Lays) च्या चिप्स उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या बटाट्याची अवैध लागवड केल्याचा आरोप केला आहे. जगभरात आपल्या हटके चिप्स साठी प्रसिद्ध असणाऱ्या लेस Lays कंपनीने हे चिप्स बनवण्यासाठी खास करून वापरण्यात येणाऱ्या बटाट्याचं कॉपीराईट (Copyright) विकत घेत कंपनीने निवडलेल्या शेतकऱ्यांनाच हे बटाटे पिकवता येणार असा निर्णय घेतला होता मात्र गुजरात मधील काही शेतकऱ्यांनी केलेल्या अवैध लागवडीमुळे या कॉपीराईटचे उल्लंघन झाल्याचे पेप्सीको कंपनीने सांगितले.

The Hindu ने मांडलेल्या वृत्तानुसार गुजरात मधील पेप्सीको कंपनीच्या शाखेने ही तक्रार करत, हे चार शेतकरी आम्ही निवडलेल्या हजार शेतकऱ्यांपैकी नसून त्यांनी केलेली लागवड म्हणजे स्वामित्व (कॉपीराईट) अधिकाराची पायमल्ली आहे, त्यासाठी या चारही शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती दिली.  शेतकरी कर्जमाफी: सरकारी तिजोरीवर किती पडेल भार? घ्या जाणून सविस्तर

एकीकडे शेतकरी संघटनेने या गरीब शेतकऱ्यांच्या वतीने पेप्सिको च्या विरोधात पवित्रा स्वीकारत सरकार व Protection of Plant Varieties and Farmers’ Rights Authority (PPV&FRA) संस्थने या खटल्यात सामील व्हावे, तसेच कायदेशीर कारवाईसाठी लागणारा खर्च हा देशाच्या जीनी फंड मधून करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पेप्सिको कंपनीने याच संस्थेच्या (PPV&FR) 2001 च्या कायद्यातील सेक्शन 64 नुसार ही लागवड अवैध असल्याचा दावा केला आहे.

याविषयी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या फूड अँड बेव्हरेज कंपनीने मागील काही महिन्यात शेतावर गुप्तहेर पाठवले होते, ज्यांनी संभाव्य ग्राहक बनून या लागवड केलेल्या शेताचे व्हिडीओज बनवले तसे बटाट्यांचे नमुनेही गोळा केले होते, या नंतर काहीच दिवसात शेतकऱ्यांना ही कायदेशीर नोटीस देण्यात आली. 2018 पासून गुजरात मधील जवळपास 9 शेतकऱ्यांवर साधारण समान आरोप पेप्सीकोने केले असल्याचे देखील यांनतर समोर आले.

आज, शुक्रवारी 26 एप्रिलला या खटल्याची पुढील सुनावणी अहमदाबाद कोर्टात होणार आहे.