Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

संत तुकाराम महाराज बीज सोहळा (Sant Tukaram Maharaj Beej Sohala) यंदा रविवारी 16 मार्च दिवशी आहे. या दिवसाचं औचित्य साधत देहूमध्ये येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेता आता ट्राफिक विभागाने वाहतूकीमध्ये बदल जाहीर केला आहे. वाहनांच्या गर्दीमुळे नागरिकांची, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आता काही वाहतूक मार्ग बदलले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

वाहतूक विभागानुसार, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहुगाव कमान कडून देहू गाव मध्ये जाणारी वाहतूक सेवा दिंडीतील वाहने वगळता खासगी वाहनांसाठी रस्ता बंद राहणार आहे. महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर अथवा कैनबे चौक, आयटी पार्क चौकाकडे जाण्यासही मनाई असणार आहे. या वाहनांना महिंद्रा सर्कल, निघोजे, मोईफाटा, डायमंड चौक मार्गे पुढे जाता येणार आहे.

जाणून घ्या पार्किंगची सोय कुठे असेल?

  • आळंदी-तळवडे बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजन काटा, काळोखे पाटील चौक येथील श्री चव्हाण यांचे पार्किंग व गायरान पार्किंग देहू येथे पार्किंग करता येईल.
  • गायरान पार्किंग देहू येथे पीएमपीएल बस थांबा असणार आहे.
  • देहू कमान देहूरोड ते देहूगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी राधाकृष्ण लॉन्सच्या शेजारील सीओडीच्या जागेत पाकिंग करता येणार आहे.
  • चाकण-तळेगांव रोडवरील देहुफाटा येथून देहुगांवकडे येणाऱ्या वाहनांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स व भगिरथी लॉन्स मध्ये पार्किंगची सोय आहे.
  • साईराज चौक ते देहूफाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स यांच्या जागेत पार्किंग करता येणार आहे.