
Happy Holi 2025 Wishes In Marathi: दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला होळीचा (Holi 2025) सण साजरा केला जातो. यावेळी होळीचा सण 14 मार्च, शुक्रवारी साजरा केला जाईल. होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा आहे, म्हणजेच 13 मार्च रोजी होलिका दहन होईल. दृक पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमा तिथी 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होते आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 पर्यंत वैध असते. 13 मार्च रोजी, फाल्गुन पौर्णिमा तिथीसह, भद्रा सकाळी 10:35 वाजता सुरू होईल, जे रात्री 11:26 पर्यंत चालेल. 14 मार्च रोजी दुपारनंतर पौर्णिमा तिथी संपत आहे, म्हणून होलिका दहन 13 मार्च रोजी केले जाईल.
हिंदू धर्मात होळीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना, प्रियजनांना, नातेवाईकांना आणि कुटुंबियांना होळीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही संदेश घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही होळीच्या शुभेच्छा देऊ शकता. सोशल मीडियाद्वारे Holi WhatsApp Status, Holi Messages, Holi Greetings, Holi Quotes पाठवून तुम्ही एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी चैत्र कृष्ण प्रतिपदा तिथी 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता सुरू होत आहे आणि ही तारीख 15 मार्च रोजी दुपारी 02:33 पर्यंत वैध असेल.