भारतासह जगभरात लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या म्हणून पहिली जात आहे. लठ्ठपणा अनेक आजारांना निमंत्रण देतो. अनेकवेळा यामुळे मृत्यूही होऊ शकतो. आता असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तुर्की तरुणाला अति खाणे महागात पडले आहे. सोशल मीडियावर एक्स्ट्रीम ईटर म्हणून प्रसिद्ध असलेला आणि टिकटॉकवर 'मुकबांग' व्हिडिओ बनवणारा 24 वर्षीय इफेकान कुल्टूर याचे लठ्ठपणामुळे निधन झाले आहे. वृत्तानुसार, तीन महिने तो रुग्णालयात दाखल होता, मात्र त्याचा जीव वाचवता आला नाही. त्याच्या मृत्यूचे कारण लठ्ठपणाशी संबंधित समस्या होती. इफेकनच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा अति खाण्याच्या धोक्यांबद्दल आणि त्याचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल वादविवाद सुरू झाला आहे. इफेकनचे व्हिडिओ लाखो लोक पाहत होते. आपल्या व्हिडीओमध्ये तो सतत काही ना काही खात असलेला दिसत होता. जास्त खाल्ल्याने इफेकनला श्वास घेण्यास त्रास होत होता.
दरम्यान, मुकबांग हा एक दक्षिण कोरियातील ट्रेंड आहे, ज्यामध्ये व्यक्ती कॅमेरा समोर भरपूर प्रमाणात अन्न खाताना दिसते. हे थेट प्रक्षेपण (livestream) किंवा आधी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले जाते. हा प्रकार 2010 च्या सुमारास लोकप्रिय झाला आणि YouTube, TikTok, Facebook, आणि Instagram यांसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रसिद्ध झाला. दक्षिण कोरियात सुरू झालेला हा ट्रेंड जगभरात पसरला आणि अनेक यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी त्याचा स्वीकार केला. अमेरिका, भारत, जपान, चीन आणि युरोपातील अनेक लोक मुकबांग व्हिडिओ बनवतात.
TikTok Star Efecan Kultur Dies:
Extreme eater TikTok star famous for his ‘mukbang’ videos dies at 24 from obesity-related issueshttps://t.co/rVaAHqWZKi
— Hindustan Times (@htTweets) March 12, 2025
This is Efecan Kultur.
He’s a famous TikToker known for binge eating.
He’s 24.
He just died. pic.twitter.com/hRjrDOqGR4
— David Santa Carla 🦇 (@TheOnlyDSC) March 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)