Man Forces Son To Run On Treadmill: अमेरिकेत एका लहान मुलाच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षांच्या मुलाला लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रयत्नात ट्रेड मिलवर बराच काळ धावायला भाग पाडले. त्यानंतर या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वडील मुलाला ट्रेड मिलवर धावण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. मुलगा ट्रेडमिलवर धावत राहतो. अनेकवेळा तो खाली पडतो मात्र त्याचे निर्दयी वडील त्याला पुन्हा धावण्यास सांगतात. अनेकवेळा ट्रेडमिलवरून खाली पडल्याने मुलाच्या हृदयाला आणि यकृताला गंभीर दुखापत झाली होती. शिवाय श्वासोच्छवासाचा वेगही अनियंत्रित राहिला. पुढे याच कारणामुळे मुलाचा मृत्यू झाला.

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार, आरोपी वडील आपल्या मुलाला तो लठ्ठ असल्यामुळे ट्रेड मिलमध्ये धावायला लावायचे. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वडिलांना खुनी घोषित करण्यासाठी कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू झाली असून, त्यावेळी हा व्हिडिओ दाखवण्यात आला. तो पाहून सगळेच चक्रावून गेले. आईला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ती कोर्ट रूममध्येच रडू लागली. (हेही वाचा: Man Dies Of Heart Attack At Gym: वाराणसी येथे जिममध्ये वॉर्मअप करताना व्यक्तीला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)