Man Dies Of Heart Attack At Gym: ब्रिटनमध्ये कोरोना लसीबाबत झालेल्या खुलाशांच्या दरम्यान, वाराणसीमध्ये जिम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दहा वर्षांपासून जिम करत असलेला हा तरुण जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर पडला आणि काही काळाने त्याचा मृत्यू झाला. याआधी त्याला ब्रेन हॅमरेज झाला होता, असे सांगण्यात येते. पियारी (चेतगंज) येथील रहिवासी 32 वर्षीय दीपक गुप्ता 10 वर्षांपासून जिममध्ये जात होता. नेहमीप्रमाणे मंगळवारीही तो सिद्धगिरी बागेत असलेल्या जिममध्ये पोहोचला. त्याने वेट ट्रेनिंगआधी वॉर्म-अप सुरू केले व अचानक तो जमिनीवर पडला आणि वेदनेने तळमळू लागला. तेथे उपस्थित असलेले इतर तरुण आणि प्रशिक्षक घाईघाईने त्याला घेऊन महमूरगंज येथील रुग्णालयात धावले. तेथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. जिम चालकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांमार्फत कुटुंबीयांना माहिती मिळाली. मोठा भाऊ दिलीप गुप्ता याच्या म्हणण्यानुसार, दीपक त्याच्या तब्येतीची खूप काळजी घेत असे. जिममध्ये तो 3 तासांपेक्षा जास्त वेळ घालवायचा. गेल्या 10 वर्षांत त्याला ताप आला नव्हता. दीपकचे 9 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगा आहे. (हेही वाचा: Hit and Run Tragedy: बसने दुचाकीस्वाराला चिरडले; अहमदाबाद येथील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)