आज (25 मे) दिवशी सकाळी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे दिल्लीतील खराब हवामान आणि इंधनाच्या कमतरतेमुळे वाराणसी विमानतळावर Emergency Landing करण्यात आले. फ्लाइट 6E2007 मध्ये सुमारे 200 प्रवासी होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, हे विमान 24 मे रोजी रात्री 11 वाजता मुंबई विमानतळावरून निघाले आणि 25 मे रोजी पहाटे 1:45 वाजता दिल्लीतउतरणार होते. पण जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे विमानाचा मार्ग विस्कळीत झाला. विमान वाराणसीला वळवण्यात आले, जिथे ते पहाटे 3:10 वाजता सुरक्षितपणे उतरले.

दिल्ली-मुंबई विमानाचे वाराणसी मध्ये इमरजंसी लॅन्डिग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)