चोरट्यांचा कहर! विमानात प्रवाशाकडून लाईफ जॅकेटची चोरी; IndiGo Flight मधील व्हिडिओ व्हायरल (Video)
विमानात एका प्रवाशाने लाईफ जॅकेटची चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याला त्याची बॅग उघडण्यास सांगताच चोरी केलेले लाईफ जॅकेट पुन्हा मिळाले.
IndiGo Flight Life Jacket Theft: इंडिगोच्या विमानातून एका प्रवाशाने लाईफ जॅकेट चोरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानात एका प्रवाशाला विमानातील क्रू मेंबपने ही चोरी करताना पकडले. त्याला त्याची बॅकपॅक उघडण्यास सांगीतले तेव्हा त्यामध्ये लपवलेले लाईफ जॅकेट पुन्हा जप्त करण्यात आले. आपत्कालीन वापरासाठी प्रत्येक सीटखाली ठेवलेले लाईफ जॅकेट हे प्रवासादरम्यान, अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा उपकरण आहे. त्याच्याशी छेडछाड करणे किंवा काढून टाकणे हे विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. या व्हिडिओमध्ये, लाईफ जॅकेट चोरताना पकडलेला माणूस घाबरलेला दिसतो. त्याशिवाय चोरीचे स्पष्टीकरण विचारताच त्याचे उत्तर देण्यास अमर्थ असल्याचे दिसतो.
इंडिगो फ्लाइटमध्ये लाईफ जॅकेट चोरताना एकला पकडले
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2025 03:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

