Yashtika Acharya Passed Away During Training Session: या आधी जीममध्ये वर्कआउट करताना अनेक लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता राजस्थानमध्ये 17 वर्षीय राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन यष्टिका आचार्य हिचा प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. बीकानेर, राजस्थान येथे प्रशिक्षण घेत असताना, ती 270 किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि वजन तिच्या मानेवर पडले, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. यष्टिका आचार्यच्या अकाली निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. या घटनेचा एका धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यष्टिकाने तिच्या लहानशा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन केले होते. गोव्यात आयोजित 33 व्या नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये तिने इक्विप्ड कॅटेगरीत सुवर्णपदक आणि क्लासिक कॅटेगरीत रौप्यपदक जिंकले होते. (हेही वाचा: Wayanad Shocker: जिममध्ये व्यायाम करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, केरळ येथील घटना)
Yashtika Acharya Passed Away (व्हिडीओमधील दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात)-
Trigger warning: Graphic details
National-level powerlifter Yashtika Acharya tragically passed away during a training session at a gym in Bikaner, Rajasthan. While attempting to lift a 270-kg weight, she lost balance, causing the weights to fall on her neck. She was immediately… pic.twitter.com/MvJG4nYtAf
— Mid Day (@mid_day) February 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)