बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाला एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. रविवारी रात्री उशिरा पाठवलेल्या या मेसेजमध्ये लिहिले होते की, आम्ही सलमान खानच्या घरात घुसून त्याला मारू. त्यानंतर मुंबईतील वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात, पोलिसांनी बडोद्यातील एका संशयिताची ओळख पटवली आहे. पोलीस याचा तपास करतीलच, अशात सलमान खानची एक सोशल मिडिया पोस्ट व्हायरल होत आहे. नुकतेच सलमान खानने त्याच्या जीम वर्कआऊटमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो बायसेप्स आणि खांदे फ्लेक्स करताना दिसत आहे. यासाठी कॅप्शन दिले आहे- ‘प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद’. असे दिसते की भाई 59 व्या वर्षीही तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सलमान शेवटचा ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' मध्ये दिसला होता, जो 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सॅकनिल्कच्या मते, या अ‍ॅक्शन ड्रामाने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 150 कोटीपेक्षा कमी कमावले आहेत. (हेही वाचा: Actor Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी; वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल)

Salman Khan's Post After Getting Threat:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)