याआधी दिल्ली मेट्रोमधील अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा मेट्रोमधील महिलांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला मेट्रोमध्ये चिप्स खाण्यावरून भांडताना दिसत आहेत. मात्र नंतर हे प्रकरण एकमेकींच्या वयावर आणि फिटनेसवर पोहोचले. ज्यामध्ये एका जास्त वजन असलेल्या 20 वर्षांच्या मुलीला एका मध्यमवयीन महिलेने अपमानास्पद शब्द वापरले. महिलेने मेट्रोमध्ये झालेल्या वादाच्या वेळी मुलीच्या संगोपनावरही टीका केली. चिडलेली महिला मुलीला म्हणाली, ‘तू 50 वर्षांची असल्यासारखे दिसत आहेत, बघ जरा स्वतःकडे. मी तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाची दिसते.’ त्यानंतर एका सहप्रवाशाने मध्यस्थी केली आणि महिलेच्या वर्तनाचा निषेध केला. पुढे हे भांडण बॉडी शेमिंगवर घसरले. (हेही वाचा: Viral Video: विवाह समारंभात नवरदेवाच्या प्रेयसीने घातला गोंधळ, गरखा येथील नारायणपूर गावातील घटना, पाहा व्हायरल व्हिडीओ)
Delhi Metro Fight Video:
Kalesh b/w Ladies Inside Delhi Metro over Eating Chips inside Metro and Debating over who's more Fit
Source: Reddit pic.twitter.com/m5AQXTqs6W
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)