महाराष्ट्रातील पुण्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका तरुणाने सोसायटीमध्ये 13 दुचाकींना आग लावली आहे. तरुणाच्या आईने त्याला ड्रग्जचे सेवन करण्यासाठी पैसे दिले नाहीत, या रागातून त्याने हे कृत्य केले. ही घटना सोसायटीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या सांगवी पोलिसांनी 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पवार हा त्याच्या कुटुंबासह मोरया क्षितिज बिल्डिंगमध्ये राहतो. स्वप्नीलला त्याच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे ड्रग्जसाठी नेहमीच पैशांची गरज भासते. अशात, सोमवारी, जेव्हा त्याच्या आईने त्याला पैसे दिले नाहीत, तेव्हा संतप्त स्वप्नीलने पार्किंगमधील 13 दुचाकी जाळल्या. या घटनेनंतर सांगवी पोलिसांनी स्वप्नीलला अटक केली. स्वप्नील कुटुंबातील सदस्यांना विनाकारण त्रास द्यायचा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. त्यामुळे त्याच्या आईनेही त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. आईने सांगितले की, स्वप्नील खूप शिकलेला आहे, मात्र त्याला ड्रग्जचे व्यसन लागले आहे. आईने पोलिसांकडे स्वप्निला कठोर शिक्षेची मागणी करत त्याला सोडू नये अशी विनंती केली आहे. (हेही वाचा: Mumbai Fire Incidents: मुंबईत 2024 मध्ये आगीच्या तब्बल 5,301 घटनांची नोंद; 2023 पेक्षा 227 जास्त)
व्यसनी मुलाने 13 दुचाकी जाळल्या:
In a shocking incident in Pimpri-Chinchwad's Pimple Nilakh area, a person torched 13 two wheelers after his parents refused to give him money for intoxication. Investigations reveal he had threatened his mother, demanding money or else he would harm her. Authorities are now… pic.twitter.com/YNIwqrzdkh
— Pune Mirror (@ThePuneMirror) March 12, 2025
#Maharashtra #Pune: A young man from Pune set fire to 13 two-wheelers parked in his society because his mother did not give him money for drugs. This incident was captured in the society's CCTV camera. The police have arrested the young man named Swapnil. pic.twitter.com/gzok5gMgNn
— Siraj Noorani (@sirajnoorani) March 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)