Online | Pixabay.com

Ministry of Corporate Affairs, कडून PM Internship Scheme 2025 च्या रजिस्ट्रेशन तारखेला मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवार 31 मार्च 2025 पर्यंत आपला अर्ज करू शकणार आहेत. या इंटर्नशीपसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना pminternship.mca.gov.in वर भेट द्यावी लागणार आहे. या इंटर्नशीप रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही फी आकारली जात नसल्याची माहिती देण्यात आली आहे. PM Internship Scheme मधून तरुणांना विविध व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीमध्ये वास्तवात त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम कसं चालते याचा 12 महिन्यांचा अनुभव मिळणार आहे.

PM Internship Scheme ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविल्या जाणाऱ्या कौशल्य विकास, प्रशिक्षणार्थी, इंटर्नशिप आणि विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादींशी संबंधित सर्व सुरू असलेल्या योजनांपेक्षा वेगळी आहे आणि अशा सर्व केंद्रीय/राज्य योजनांपेक्षा वेगळी चालवली देखील जाते.

PM Internship Scheme साठी पात्रता निकष?

  • उमेदवार किमान हायस्कूल उच्च माध्यमिक शाळा उत्तीर्ण केलेला असावा, आयटीआयचे प्रमाणपत्र असावे, पॉलिटेक्निक संस्थेचा डिप्लोमा असावा किंवा बीए, बीएससी, बी.कॉम, बीसीए, बीबीए, बी.फार्मा चा पदवीधर असावा.
  • उमेदवाराचे वय अर्ज करताना 21-24 वर्ष असावे.
  • उमेदवार भारतीय नागरीक असावा.
  • उमेदवार कोठेही पूर्ण वेळ कर्मचारी किंवा पूर्ण वेळ शिक्षण कोर्सचा विद्यार्थी नसावा. online/ distance learning programmes चे विद्यार्थी पात्र असतील.

PM Internship Scheme साठी कसा कराल अर्ज?

  • PM Internship Scheme ची वेबसाईट pminternship.mca.gov.in.ला भेट द्या.
  • रजिस्टर लिंक वर क्लिक करा. आता एक नवी विंडो उघडेल.
  • तुमची माहिती भरा आणि सबमीट करा.
  • उमेदवाराने भरलेल्या माहितीच्या आधारे आता पोर्टल तुमचा रेझ्युमे बनवेल.
  • तुमचं स्थान, कामाचं क्षेत्र, कामाची भूमिका आणि शैक्षणिक पात्रता यावर आधारित प्राधान्यांनुसार 5 इंटर्नशिप संधींसाठी अर्ज करता येईल.
  • त्यानंतर अर्ज करा आणि confirmation page डाऊनलोड करा.

इंटर्नशिप कालावधीत इंटर्नशिप करणाऱ्यांना मासिक 5000 रूपये मिळणार आहेत. यामध्ये 4500 भारत सरकार आणि 500 रूपये काम करत असलेली कंपनी देईल. याव्यतिरिक्त, त्यांना 6000 रूपयांचे एक वेळचे अनुदान मिळेल. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा अशा बड्या कंपनींमध्ये कामाची संधी उमेदवारांना मिळणार आहे.