शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्पीय निधीवाटप आणि लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयांना 'निर्लज्ज धोरण' म्हटले आहे. त्यांनी सत्ताधारी प्रशासनावर निवडणूक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आणि योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या कमी केल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आजही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये दिले जात आहेत आणि महिला लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.
महिला सक्षमीकरण उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा उद्देश पात्र महिलांना आर्थिक मदत देणे आहे. तथापि, विरोधी पक्षनेते असा दावा करतात की, सरकार त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे, ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणी आणि अर्थसंकल्पीय तरतुदींबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या योजना भविष्यात बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर प्रहार
Mumbai: On Budgetary announcement for Ladki Behen Scheme, Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray says, "This is a different kind of shameless policy. They are working against all the promises made during the elections. Even today, only Rs. 1500 is being given to the Ladli sisters.… pic.twitter.com/mpXcyfE6FF
— ANI (@ANI) March 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)