Happy Holi 2025 Messages In Marathi (फोटो सौजन्य - File Image)

Happy Holi 2025 Messages In Marathi: चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला होळी (Holi 2025) चा सण साजरा केला जातो. यंदा होळीचा सण 13 मार्चला साजरा करण्यात येणार असून 14 मार्च रोजी धुलिवंदन साजरे करण्यात येणार आहे. तथापि, धुलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन करण्याची परंपरा आहे, म्हणजेच 13 मार्च रोजी होलिका दहन होईल. होलिका दहनाच्या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात.

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते. महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी होळीच्या काही खास मराठमोळ्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. तुम्ही त्या सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकता.

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद

अखंड उठु दे मनी रंग तरंग…

व्हावे अवघे जीवन दंग

असे उधळूया आज हे रंग…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Holi 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

होळी संगे केरकचरा जाळू

झाडे वाचवू अन् कचरा हटवू

निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Holi 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

पाणी जपुनिया,

घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…

होळी खेळण्यास

प्रेमाचा एक रंगच पुरेसा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Holi 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

थंड रंगस्पर्श

मनी नवहर्ष

अखंड रंगबंध

जगी सर्वधुंद…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Holi 2025 Messages In Marathi 4(फोटो सौजन्य - File Image)

होळी दरवर्षी येते आणि

सर्वांना रंगवून जाते,

ते रंग निघून जातात पण,

तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो

हॅपी होली

Happy Holi 2025 Messages In Marathi 5(फोटो सौजन्य - File Image)

यावेळी होलिका दहन म्हणजेच होळी 13 मार्च, गुरुवारी साजरी केली जाईल. यावेळी होळीचा शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी सकाळी 10.35 वाजता सुरू होईल. तथापि, 14 मार्च रोजी सर्वत्र धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात येईल.