
Andhra Pradesh News: अमिताभ बच्चन अभिनीत सिनेमा सूर्यवंशम (Sooryavansham) या प्रसिद्ध सिनेमातील अभिनेत्री सौंदर्या (Actress Soundarya) हिच्या विमान अपघातात झालेल्या अकाली मृत्यूनंतर जवळजवळ 20 वर्षांनी, ज्येष्ठ तेलुगू अभिनेते मोहन बाबू (Mohan Babu) यांच्यावर तिच्या कथित हत्येत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झाली आहे. दाखल तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की 2004 मध्ये अभिनेत्री सौंदर्या (Actress Soundarya’s Death Case) हिचा विमान अपघात हा अपघात नव्हता तर मालमत्तेच्या वादाशी जोडलेले नियोजित कृत्य होते. तब्बल दोन दशकांनंतर अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक आरोप झाल्याने संपूर्ण टॉलीवूड आणि तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोहन बाबू यांनी जमीन हडपल्याचा तक्रारीत आरोप
अभिनेत्री सौंदर्या विमान अपघात आणि मत्यू संदर्भात तक्रार करणाऱ्या तक्रारकर्त्या चिट्टीमल्लू यांच्या दाव्यानुसार, मोहन बाबू यांनी सौंदर्या आणि तिच्या भावावर शमशाबादमधील सहा एकर जमीन विकण्यासाठी दबाव आणला होता. तथापि, भावंडांनी नकार दिल्याने तीव्र संघर्ष निर्माण झाला. तक्रारदाराने पुढे असा आरोप केला आहे की सौंदर्याच्या मृत्यूनंतर मोहन बाबूंनी जबरदस्तीने जमीन ताब्यात घेतली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात तक्रार दाखल झाली असली तरी, आतापर्यंत, या प्रकरणात कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. तक्रारदाराचे सौंदर्या आणि मोहन बाबू यांच्याशी असलेले संबंध अस्पष्ट असल्याचेही बोलले जात आहे. (हेही वाचा, Malavika Mohanan 'Yudhra' Movie: मालविका मोहनन आणि Siddhant Chaturvedi यांचा 'युध्र' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; काय असेल खास)
अभिनेत्री सौंदर्या हिचा अपघाती मृत्यू
अमिताभ बच्चन अभिनीत 'सूर्यवंशम' (1999) या चित्रपटात राधाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदर्या एका राजकीय कार्यक्रमास खासगी विमानाने निघाल्या होत्या. या कार्यक्रमास जात त्यांच्या विमानास 17 एप्रिल 2004 रोजी अपघात झाला. ज्यामध्ये या विमानाने पेट घेतला आणि आगीच्या भक्षस्थानी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्या 31 वर्षांच्या होत्या. शिवाय, त्या काळात त्या गर्भवती असल्याचेही सांगितले जाते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातस्थळावरून तिचा मृतदेह कधीच सापडला नाही.
सौंदर्या यांच्या मृत्यूबाबत फेरचौकशीची मागणी
तक्रारदाराने राज्य सरकारला कथित जमीन हडपण्यात मोहन बाबूच्या भूमिकेची चौकशी करण्याची विनंती केली आहे आणि जमीन जप्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तक्राकरर्त्याने आपल्या तक्रारीत दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्या खालील प्रमाणे:
जमीन हडपणे आणि सौदर्या मृत्यू प्रकरणात मोहन बाबू यांची चौकशी व्हावी
खम्मम एसीपी आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे
त्यांच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत पोलिस संरक्षणाची विनंती केली आहे
चिट्टीमल्लू (तक्रारकर्ता) यांनी त्यांच्या तक्रारीत मोहन बाबूच्या कुटुंबात, विशेषतः अभिनेता आणि त्यांचा धाकटा मुलगा मंचू मनोज यांच्यात सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादाचा उल्लेख केला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कौटुंबिक कलहाची पार्श्वभूमी अशी की, 2023 मध्ये, मोहन बाबूंनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भांडणादरम्यान एका पत्रकारावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांचा मोठा मुलगा मंचू विष्णू या घटनेला साधारण लेखत होता आणि तो कौटुंबिक मुद्दा होता जो लवकरच सोडवला जाईल असे म्हटले होते. दरम्यान, या नवीन आरोपांमुळे, सौंदर्याच्या दुःखद मृत्यू आणि मोहन बाबूच्या मालमत्तेच्या वादामुळे या प्रकरणात पुन्हा रस निर्माण झाला आहे. हे प्रकरण आणि आरोपांनंतर पोलीस अधिकृत चौकशी सुरू करतील की नाही याबातब उत्सुकता आहे.