Mahmudullah has Retired: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या नंतर बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू महमुदुल्लाहने निवृत्तीची घोषणा केली आहे. महमुदुल्लाहने गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये महमुदुल्ला बांगलादेशकडून खेळला नव्हता. गेल्या वर्षी, त्याने भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता त्याने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 39 वर्षीय महमुदुल्लाहने तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)