मुंबईत चारकोप येथील एका एअरटेलच्या गॅलरीमध्ये महिला कर्मचार्‍याने मराठी भाषेत बोलायला नकार देत उद्दामपणाची भाषा वापरल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. त्यानंतर मुंबई मध्ये मनसे आणि उबाठा गटाकडून या घडल्या प्रकाराविषयी आवाज  उठवत एअरटेलला धारेवर धरले. त्यानंतर एअरटेल कडून माफीनामा जारी करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ मध्ये उद्दाम भाषेत बोलणार्‍या महिला कर्मचा‍‍‍‍‍र्‍याला कामावरून हटवल्याचं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं' .

एअरटेलचा माफीनामा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)