राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'
यंदा राज ठाकरेंनी आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 14 जून दिवशी वाढदिवस आहे. दरवर्षी राज्याच्या कानाकोपर्यातून मनसे कार्यकर्ते 'शिवतीर्थ' वर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. पण दरम्यान मनसे आणि उबाठा गटाच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरेंच्या वाढदिवसाआधी 13 जूनला आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते उत्साहात काही पोस्टरबाजी करत असल्याचं बघायला मिळत आहे. पण कोणतेही विशेष कारण नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायलाअ न येण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,
सस्नेह जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/1N5OJEVYeJ
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 11, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

