
Airtel ने मंगळवारी (11 मार्च) तर Jio ने आज (12 मार्च) सकाळी Elon Musk च्या SpaceX सोबत करार करत आता Starlink भारतामध्ये आणणार असल्याची घोषणा केली आहे. आता देशामध्ये Starlink Satellite Internet Services लॉन्च करत या दोन्ही टेलिकॉम कंपन्या अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या भागात अजूनही इंटरनेट सेवा पोहचू शकली नाही अशा दुर्गम भागापर्यंत ती पोहचवली जाईल. यामध्ये दुर्गम भागातील शाळा. आरोग्य यंत्रणा यांचा समावेश असणार आहे. भारतामध्ये ही घोषणा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये, भारत सरकारने आवश्यक मंजुरी न घेता उपग्रह इंटरनेट सेवा दिल्याबद्दल फटकारल्यानंतर, स्पेसएक्सला त्यांच्या स्टारलिंक उपकरणांच्या प्री-ऑर्डर परत करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे भारतात ही सेवा उपलब्ध करून देणं स्टारलिंक साठी देखील आव्हानात्मक आहे.
Starlink Satellite Internet Services कशी आहे?
एलोन मस्कच्या SpaceX ची Starlink ही उपकंपनी आहे. त्याच्या द्वारा सुमारे 7000 उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा दिली जाते. हे उपग्रह low-Earth orbit मध्ये उपलब्ध असल्याने, कंपनी जगातील दुर्गम भागातही इंटरनेट सेवा देण्यास सक्षम आहे. Jio Partners with SpaceX: स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट भारतात आणण्यासाठी जिओची स्पेसएक्ससोबत भागीदारी.
भारतात Starlink Satellite Internet Services कधी येणार?
Airtel आणि Jio कडून करार झाल्याची माहिती देण्यात आली असली तरीही अजूनही अनेक गोष्टी सरकारच्या regulatory approvals वर देखील अवलंबून आहे. कालच एअरटेल कडून जारी प्रेस रीलीज मध्ये भारतात स्टारलिंक विकण्यासाठी SpaceX ला स्वतःच्या परवानग्या मिळण्यावर ते अवलंबून असल्याचं सांगण्यात आले आहे. तशीच माहिती जिओ कडूनही देण्यात आली आहे. आता ही सुविधा भारतामध्ये प्रत्यक्ष येण्यासाठी त्यांना भारत सरकार कडून परवानगी मिळवणं आवश्यक आहे.
भारतात दर काय असू शकतील?
जेव्हा Starlink भारतात लाँच होईल तेव्हा त्याची किंमत रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देऊ केलेल्या प्लॅन्सपेक्षा जास्त असेल कारण परदेशी डिजिटल सेवांवर 30% कर आकारला जातो. असा अंदाज आहे की स्टारलिंक इंडिया प्लॅन्स दरमहा सुमारे 3500 ते 4500 रुपयांपासून सुरू होऊ शकतात.
SpaceX ची Starlink भूतानमध्ये उपलब्ध आहे, जिथे ते सुमारे 3,000 रूपये मध्ये रेसिडेन्शियल लाइट प्लॅन आणि 4,200 रूपये मध्ये स्टँडर्ड रेसिडेन्शियल प्लॅन देतात. जे अनुक्रमे 23 ते 100 Mbps आणि 25 ते 110 Mbps स्पीडने काम करत आहे.