Sunita Williams (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

भारतीय वंशाची अमेरिकन नासा NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) पुढील आठवड्यात पृथ्वीवर परतणार आहेत. हे दोघे गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले आहे. आता दोघेही स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून निघतील, जे पुढील आठवड्यात मदत पथकासह प्रक्षेपित होणार आहे. नासाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, ही जोडी 16 मार्च रोजी पृथ्वीवर परतेल. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर विमानाच्या चाचणी उड्डाणासाठी अंतराळ स्थानकावर गेले होते. पण अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या अंतराळयानात काही समस्या निर्माण झाल्या. यानंतर ते परत येऊ शकले नाहीत.

त्यांच्या कॅप्सूलमध्ये वारंवार बिघाड झाल्यानंतर, ते आयएसएसवरच थांबले. पुढे त्यांच्या परतीची तारीख वाढतच राहिली. अंतराळवीरांना स्टारलाइनर अंतराळयानात सुमारे 10 दिवस राहायचे होते, परंतु त्यांच्या कॅप्सूलमधील समस्यांमुळे एजन्सीला त्यांचे परतणे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावे लागले. सध्या त्या नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर संशोधन करत आहे. फेब्रुवारीमध्ये सुनीता आणि बॅरी यांना पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरू झाली व आता नासाने स्पष्ट केले आहे की 12 मार्च रोजी त्यांना घेण्यासाठी एक अंतराळयान पाठवले जाईल.

याआधी नासाचे अंतराळवीर निक हेग आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना स्पेसएक्स क्रू-9 मोहिमेवर आयएसएसमध्ये पाठवण्यात आले, ज्यामध्ये अडकलेल्या अंतराळवीरांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या. पण तेही मिशन अयशस्वी झाले. ते मूळ फेब्रुवारीमध्ये परतणार होते. आता चारही अंतराळवीर 16 मार्च रोजी एकत्र परततील. चार अंतराळवीरांना घेऊन स्पेसएक्स क्रू-10 यान अवकाशात सोडले जाईल. त्याच्या आगमनानंतर, क्रू-9 चे सदस्य पृथ्वीवर परत पाठवले जातील. (हेही वाचा: ISRO 100th Mission: श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही रॉकेटसह एनव्हीएस-02 उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीरित्या लॉन्च)

क्रू-10 मध्ये नासाच्या अंतराळवीर अ‍ॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स यांच्यासह जपानी अंतराळ संस्थेतील दोन अंतराळवीरांचा समावेश आहे. ही टीम 12 मार्च रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण करणार आहे. मात्र, जर क्रू 10 च्या मोहिमेत काही विलंब झाला तर, क्रू 9 चे परतणे देखील पुढे ढकलले जाईल. क्रू 10 च्या बॅकअप लाँच तारखा 13 मार्च रोजी संध्याकाळी 7.35 वाजता आणि 14 मार्च रोजी संध्याकाळी 7.04 वाजता उपलब्ध आहेत. तसे झाले तर, क्रू 9 चे परतणे 17 किंवा 18 मार्च रोजी होईल.