Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील 1983 World Cup विजेत्या संघाचा पाठिंबा
Vinesh Phogat and Sakshi Malik | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

India's 1983 World Cup Squad Supports Wrestlers Protest: दिल्ली येथील कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दूर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारवरचा दबाव आता वाढू लागला आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता हळूहळू पाठिंबा मिळतो आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कपिल देव (Kapil Dev), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्यासह जवळपास अवघ्या संघानेच या आंदोलनाला पाठिंबा देत भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात भारतातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी केलेल्या निषेधावर भाष्य केले आहे.

विश्वविजेत्या 1983 च्या क्रिकेट संघाने म्हटले आहे की, नव्या संसदेचे उद्घाटन करताना 28 मे रोजी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेल्या वागणुकीमुळे ते व्यथित झाले आहेत. भारताला पहिल्यांदाच विश्वचषक मिळवून देणाऱ्या 1983 च्या वर्ल्ड चॅम्पियन्स संघाने म्हटले आहे की, आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंच्या अयोग्य दृश्यांमुळे आम्ही झालो आहोत. WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.त्यांची तक्रार ऐकून घ्यायला हवी. ब्रिजभूषण यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Wrestlers Protest: जागतिक पातळीवर पोहोचले कुस्तीपटूंचे आंदोलन; United World Wrestling ने दिला पाठींबा, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियावर बंदी घालण्याची धमकी)

दरम्यान, न्याय मिळाला नाही तर पदके गंगा नदीत फेकण्याचा इशारा देणाऱ्या कुस्तीपटूंना क्रिकेटपटूंनी सबूरीचा सल्ला दिला आहे. आतताईपणा करुन कोणत्याही प्रकारचा निर्णय घाईगडबडीत घेऊ नका, असे क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.

ट्विट

भारताचा 1983 विश्वचषक संघ

सुनील गावस्कर, क्रिश श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील, कपिल देव (कर्णधार), कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, मदन लाल, सय्यद किरमाणी (wk), बलविंदर संधू.

जंतरमंतरवरील कुस्तीपटूंच्या निषेधाचे ठिकाण पोलिसांनी मोकळे केल्यानंतर आणि संसदेच्या नवीन इमारतीकडे कूच करत असताना पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. त्यानंतर आक्रमक झालेल्या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह पदकविजेते अनेक खेळाडू 30 मे रोजी हरिद्वारच्या हर की पौरीमध्ये गेले. तेथे त्यांनी पोलिसांकडून मिळेलेली वागणूक आणि केंद्रसरकारच्या वर्तनाविरोधात आपली पदके गंगा नदीत फेकण्याचा इशारा दिला आणि सरकारला अल्टीमेटम देऊन ते निघून गेले.