Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी सिल्क्यारा डंडालगाव दरम्यान सुरु असलेल्या कामादरम्यान कोसळलेल्या बगद्यात 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकून आहेत. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी सुरु असलेली मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मजूर आणि बाहेरील जग यांच्यात आता फक्त काही मिटरचे अंतर बाकी आहे. त्यामुळेहे अंतर कापले की, बोगद्यात अडकलेले मजूर केव्हाही बाहेर येऊ शकतात. त्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून एक रुग्णवाहीकाही बोगद्यात गेल्याचे वृत्त आहे. मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत. असे असले तरी मदत आणि बचावकार्य चिकाटीने सुरुच आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेसुद्धा या ठिकाणी परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरकाशी बोगद्यामध्ये हाय पॉवर ड्रिलिंग मशीनचा वापर करुन मोठे छिद्र पाडण्याचे काम सुरु आहे. ज्यामुळे एक मोठी नळी बोगद्यात अडकेल्या मजुरांपर्यंत पोहोचवली जाईल. दरम्यान, मजूरांपर्यंतचे पोहोचण्यासाठीचे अंतर फारच कमी असल्याने जर ड्रिल करण्यासाठीचे ऑगर मशीन खराब झाले तर आता यंत्रावर अवलंबून न राहता थेट बाहेरील मजुरांकडून हाताने खोदकाम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. (हेही वाचा, Uttarkashi Tunnel Collapse Rescue Update: उत्तरकाशीत बोगद्यात अडकले 41 जीव, Vertical Drilling सह 'या' 5 पर्यायांमुळे बचावकार्य होणार सोप)
दुसऱ्या बाजूला मायक्रो टनलिंग एक्स्पर्ट्सनी म्हटले आहे की, काल म्हणजेच 27 नोव्हेंबरच्या रात्री काम चांगल्या प्रकारे झाले. एका रात्रीत जवळपास 50 मीटरपर्यंत बोगदा करण्यात आला. आता केवळ पाच ते सहा मीटर अंतर कापणे बाकी आहे. काल रात्री आम्हाला बोगदा खणताना कोणताही अडथळा आला नाही. बऱ्याच गोष्टी सकारात्मक असल्याचे संकेत आम्हाला मिळाले.
व्हिडिोओ
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Visuals from the Silkyara tunnel where the operation to rescue 41 workers is ongoing.
First visuals of manual drilling ongoing inside the rescue tunnel. Auger machine is being used for pushing the pipe. So far about 2 meters of… pic.twitter.com/kXNbItQSQR
— ANI (@ANI) November 28, 2023
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाठिमागील काही दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्याच्या मोहीमेवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, त्यांनीही या मोहीमेला बळ यावे आणि बोगद्यातील कामगारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नागरिकांनी प्रार्थना करावी, असे अवाहन त्यांनी जनतेला केले.
व्हिडिओ
#WATCH उत्तरकाशी सुरंग बचाव | एक एम्बुलेंस को सुरंग के अंदर ले जाया जा रहा है। ताजा अपडेट के मुताबिक 55.3 मीटर तक पाइप डाला जा चुका है। pic.twitter.com/6OmG67dXxB
— ANI_HindiNews (@AHindinews) November 28, 2023
वाचकांच्या माहितीसाठी असे की, 'रेट हॉल मायनिंग' एक्सपर्टचीही या कामी मदत घेण्यात आली आहे. जेणेकरुन बोगद्यातील राडारोडा हाताने साफ करता येईल. हे काम करताना जर काही अडथळे आले तर त्याचे मशीनद्वारे तुकडे करुन हटविण्यात येणार आहे. यापूर्वीच ऑगर मशिन वापरली जाणार होती. मात्र ती खराब झाल्यानंतर मॅन्यूअल ड्रिलिंगच्या माध्यमातून कामगारांना बाहेर काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.