Passing Out Parade, Dehradun (Photo Credit-IANS)

डेहराडून: शनिवारी 8 जून ला सकाळी भारतीय सैन्य अकादमी तर्फे प्रशिक्षणार्थी जवानांची पासिंग आऊट परेड आयोजित करण्यात आली होती . या दिमाखदार सोहळ्याच्या नंतर 382 जवानांची भारतीय सैन्यात भरती करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 28 शिलेदारांचा देखील समावेश आहे. तब्बल दोन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर आज 459 जवानांसाठी या परेडचे आयोजन करण्यात आले होते. यातील 382 जणांचे सैन्यातील स्थान पक्कं झालं आहे. , यात 9  मित्र राष्ट्रांमधील 77 जवानांचा देखील समावेश असणार आहे. दक्षिण पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टिनेंट जनरल चेरिश मैथसन हे प्रमुख अतिथी होते. परेडमध्ये सामील झालेल्या जवानांनी त्यांना सलामी दिली

IMA ने आजवरच्या इतिहासात 61536 जवानांना प्रशिक्षण देऊन सैन्यासाठी तयार करण्याचा रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे.यंदाच्या पासिंग आऊट परेड मध्ये उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त जवानांचा समावेश होता त्यापाठोपाठ बिहार, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, महाराष्ट्र्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यातील सर्वाधिक कॅडेट्सना सैन्यात स्थान प्राप्त झाले. अंदमान निकोबार मधून यंदा एका ही कॅडेटला ही संधी मिळाली नाही. यासोबतच अफगाणिस्तान,भूतान, फिजी, लेसोथो, मालदीव, मॉरिशस,पपुआ न्यू गिनी,तजाकिस्तान व टोंगा या देशातील 77 विदेशी कॅडेट्सचा समावेश होता. खुशखबर! भारतीय लष्करात पहिल्यांदाच होणार महिला पोलिसांची भरती; पहा कुठे कराल अर्ज

ANI ट्विट 

 पुरस्कारांनी केला गौरव

पासिंग आऊट परेडच्या नंतर लगेचच पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कॅडेट मनोज डोग्रा यांना सर्वोत्तम शारीरिक बळासाठी पॅराशूट रेजिमेंट मेडल देण्यात आले. सिनीअर अंडर ऑफिसर अक्षत राज यांना या सोहळ्यात सर्वोच्च स्वार्ड ऑफ ऑनर अवार्डने सम्मानित करण्यात आले. यापाठोपाठ सुरेंद्र सिंग बिश्त यांना सुवर्ण पदक, कौशलेश कुमार यांना रौप्य पदक देऊन गौरवण्यात आले. करण सिंग यांना तांत्रिक अव्वलतेसाठी रौप्य पदक तर अफगाणिस्तानच्या शहजाद सरबाज यांना फॉरेन जीसीचा अवॉर्ड देण्यात आला.

पासिंग आऊट परेडची एक झलक

पासिंग आऊट परेड मध्ये IMA चे कमांडर ले. जनरल एसके झा, डेप्युटी कमांडर मेजर जनरल जीएस रावत यांच्यासोबतच अनेक पदाधिकारी व निवृत्त अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. याशिवाय सहभागी जवानांच्या कुटुंबियांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.