खुशखबर! भारतीय लष्करात पहिल्यांदाच होणार महिला पोलिसांची भरती; पहा कुठे कराल अर्ज
Female Force in the Indian Army: Image Used for Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

भारतीय इतिहासात पहिल्यांदाच महिलांना थेट लष्करात भरती होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. याआधी फक्त उच्च पदांवरच महिलांची भरती (Recruitment of Women) होत असे, मात्र आता लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’ (Military Police) विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून, ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी चार महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. ‘मिलिटरी पोलिस’ या विभागात महिला पोलिसांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याची लष्कराची योजना आहे.

लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in  या वेबसाइटवर तुम्ही अर्ज करू शकता. 25 एप्रिल, 2019 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 जून असणार आहे. सध्या जनरल डय़ुटीवरील 100 पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे, हळू हळू हे प्रमाण वाढत जाणार आहे. (हेही वाचा: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य क्षेत्रात मेगाभरती, 10 वी पास असणारेही करू शकतात अर्ज)

पात्रता –

> उमेदवार कमीत कमी 45 % मार्कांनी दहावी पास असावा. तसेच प्रत्येक विषयात कमीत कमी 33 मार्क्स असावेत.

> उमेदवारांची उंची 142 सेंटीमीटर असावी

> वय 17 ते 21 वर्ष निर्धारित करण्यात आले आहे.

अर्ज केलेल्या उमेदवारांमधून छाननी केलेल्या उमेदवारांना शारीरिक आणि लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल. लांब उडी, उंच उडी, धावणे अशा शारीरिक चाचणी असणार आहेत. दोन्ही परीक्षा झाल्यावर त्यांचे निकाल वेबसाईटवरच प्रसिद्ध केले जातील.सैन्य दलात आरोग्य, विधी, शिक्षण सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांत महिला कर्मचारी आहेत. मात्र यापुढे महिला जवानदेखील असणार आहेत. सुरुवातीच्या काळात सैन्य दलात 800 महिला जवानांची भरती करण्यात येईल, त्यासाठी दरवर्षी 52 महिलांना सामावून घेतले जाणार आहे.