सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य क्षेत्रात मेगाभरती, 10 वी पास असणारेही करू शकतात अर्ज
Representational Image (Photo Credit: PTI)

गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक सरकारी नोकऱ्यांच्या भरतीची (Job Recruitment) घोषणा झाली आहे. रेल्वेकडूनही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ (University of Health Sciences) या सरकारी संस्थेमध्ये नोकरभरती होणार आहे. एकूण 976 जागांसाठी ही भरती होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामधील काही जागांसाठी फक्त 10 वी पास अशी पात्रता आहे. त्यामुळे तुम्ही जर का 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर याठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता.

या जागांसाठी असेल भरती –

स्टेनो, क्लार्क, स्टाफ नर्स, लॅबोरेटरी टेक्निशियन, स्टोअर किपर, लॅबोरेटरी अटेंडट आणि ऑपरेटिंग

पदांची एकूण संख्या –

स्टाफ नर्स – 595

क्लार्क – 54

स्टेनो टायपिस्ट – 30

स्टेनो किपर – 25

लॅबोरेटरी टेक्निशियन – 113

लॅबोरेटरी अटेंडंट – 123

ऑपरेटिंग थिअटर टेक्निशियन – 36

कालपासून uhsr.ac.in. या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची मुदत सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 मे असणार आहे. (हेही वाचा: SBI मध्ये 8904 जागांसाठी क्लर्क भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शैक्षणिक योग्यता)

पात्रता –

यामध्ये लॅबोरेटरी अटेंडंट या पदासाठी 10 वी पास असणारी व्यक्तीही अर्ज करू शकते. मात्र इतर पदांसाठी त्या त्या क्षेत्राशी निगडीत पदवी असणे गरजेचे आहे.