केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Union Budget 2025) सादर करत आहेत. सकाळी 11:00 वाजता त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात केली. या अर्थसंकल्पाचे विविध माध्यमांतून थेट प्रसारण (Union Budget 2025 Live Streaming) केले जात आहे. आपणही या भाषणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पाहू शकता. जाणून घ्या या भाषणाचे थेट प्रक्षेपण आपण कोठे पाहू शकता? वाचकांच्या माहितीसाठी असे की, केंद्र सरकार त्यांच्या संसद टीव्ही ही वाहीणी आणि युट्युब चॅनल आणि अर्थमंत्रालयाच्या संकेतस्थळावरुन या भाषणांचे लाईव्ह प्रक्षेपण करते.
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 लाईव्ह कुठे पाहाल?
अर्थसंकल्पाचे अधिकृत संकेतस्थळ-indiabudget.gov.in वर थेट प्रक्षेपण करता येईल.
संसद टीव्हीः संसदेची वाहिनी, संसद टीव्ही, अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण करत आहे. तो दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन मंचांवर उपलब्ध आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आता केंद्र सरकारही राबवणार? बजेटपूर्वी जोरदार चर्चा; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या निर्णयाकडे लक्ष)
केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषण करताना
इंडिया टुडे टीव्ही आणि संकेतस्थळः लाईव्ह अपडेटसाठी, प्रेक्षक इंडिया टुडे टीव्हीची निवड करू शकतात आणि बजेट कव्हरेजसाठी Indiatoday.in ला भेट देऊ शकतात.
झी बिझनेसः अंदाजपत्रक भाषण झी बिझनेस वृत्तवाहिनीवर थेट प्रसारित केले जात आहे, झी बिझनेसच्या संकेतस्थळांवर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रत्यक्ष-प्रक्षेपण सुरु आहे. (हेही वाचा, Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज)
युट्युबः झी बिझनेसच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर आणि संसद टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता.
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?
भारतीय केंद्रीय अर्थसंकल्प हा अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केलेला वार्षिक वित्तीय अहवाल आहे. ज्यामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत चालणाऱ्या आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाच्या योजनांची रूपरेषा असते. केंद्रीय अर्थसंकल्प हा पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, संरक्षण आणि इतर अनेक बाबींसह अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे असतात:
महसुलाचे अंदाजः यामध्ये कर, गैर-कर महसूल आणि इतर स्त्रोतांकडून अपेक्षित उत्पन्न समाविष्ट आहे.
खर्चाचे अंदाजः यामध्ये विविध सरकारी योजना, विकास प्रकल्प, पगार, अनुदान, संरक्षण आणि इतर खर्चांवरील अंदाजित खर्चाचा समावेश होतो.
वित्तीय तूटः सरकारचा एकूण खर्च आणि त्याचा एकूण महसूल (कर्ज वगळता) यातील फरकाला वित्तीय तूट असे म्हणतात.
निधी वाटपः संतुलित विकास आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी विविध मंत्रालये, क्षेत्रे आणि कल्याणकारी कार्यक्रमांसाठी निधीचे वाटप केले जाते.
केंद्रीय अर्थसंकल्प हो कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यामध्ये जनता, देशासमोरील प्रश्न आणि या प्रश्नांवर होणार खर्च, सरकारची दिशा यांची मांडणी होते. भारतासारख्या देशात सरकारवर हा अर्थसंकल्प सादर करताना प्रचंड दाबव असतो.