देशभरात कहर निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरस (Covid 19) संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 35 हजार कोटी रुपये निधीची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांनी सन 2021/22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत मांडला. या वेळी त्यांनी ही घोषणा केली. केंद्रीय अर्थसंकल्प 2021/22 सादर ( Union Budget 2021) करताना अर्थमंत्री म्हणाल्या, आजारांशी लढा आणि त्यांचे नियंत्रण हे सरकारसमोरील प्रमुख उद्दीष्ट आहे. त्यासाठी देशात 15 हेल्थ इमरजन्सी सेंटर्स उभारण्यात येतील. यासोबतच कोरोना व्हायरस नियंत्रण लसिकरणासाठी (Covid 19 Vaccination ) 35 हजार कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान म्हटले की, पंतप्रधानांनी 80 मिलियन कुटुंबीयांसाठी अनेक महिन्यांसाठी एलपीजी गॅस मोभत दिला. त्यासोबतच रोख रक्कम आणि इतर साहित्यही दिले. या वेळी आरोग्य क्षेत्रातील नीधीची तरदूद वाढविण्यात आली आहे.
पुढे बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, हा अर्थसंकल्प एका अशा काळात तयार करण्यात आला आहे जो काळ यापूर्वी देशाने कधीही पाहिला नाही. 2020 मध्ये म्ही कोविड 19 संकटात काय काय सहन केले याला परिसीमा नाही. पंतप्रधान मोदी यांनी 2.76 लाख कोटी रुपये पीएम गरीब कल्याण योजनेसाठी घोषीत केली. यासोबतच 800 मिलियन लोकांसाठी मोफत खाद्यान्नही उपलब्ध करुन दिले. (हेही वाचा, Union Budget 2021-22: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी काँग्रेस पक्षाने केले ट्विट; सरकारला करुन दिली आव्हानांची जाणीव)
#WATCH Live: FM Nirmala Sitharaman presents Union Budget 2021-22 (source: Lok Sabha TV) https://t.co/FX7Xx2x0fe
— ANI (@ANI) February 1, 2021
अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारसमोर आव्हानेही तितकीच मजबूत आहेत. विकासदरवृद्धीसोबतच उद्योजक आणि विविध क्षेत्रांना दिलासा देत असताना सर्वसामान्यांच्या झोळीतही बरेच काही टाकण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. कोरोना काळात लकडाऊन असताना केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे. परंतू, ते फारसे प्रभावी ठरलेच नाही. त्यामुळे आता केंद्र सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या पदरात काय दान टाकते याबाबत उत्सुकता आहे.