Budget 2021 सत्रादरम्यान Nirmala Sitharaman यांच्याकडून ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचं कौतुक, पहा काय म्हणाल्या अर्थमंत्री
टीम इंडिया आणि निर्मला सीतारामन (Photo Credit: PTI)

टीम इंडियाच्या (Team India) ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका (Border Gavaskar Tropy) ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर (Indian Team) कौतुकांचा वर्षाव करण्यात येत आहे. क्रिकेट चाहते असो किंवा प्रतिष्ठित व्यक्ती सर्वांकडून भारतीय संघाच्या विजयाची दखल घेतली जात आहे. बीसीसीआने टीम इंडियाला बक्षिस म्हणून 5 कोटींचा बोनस जाहीर केला, तर आनंद महिंद्रा यांनी युवा खेळाडूंना बक्षिस म्हणून भेट जाहीर केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचं कौतुक केलं आणि आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आपल्या अर्थसंकल्पनेची (Budget) सुरुवात टीम इंडियाला शुभेच्छा करत केली. सीतारामन म्हणाल्या की, "टीम इंडियाला मिळालेल्या यशा प्रमाणेच अर्थसंकल्पालाही यश मिळेल अशी आशा आहे!" आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांना ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या विजयाचा संदर्भ दिला. अर्थमंत्री म्हणाले की, टीम इंडियाचा विजय हा भारताच्या तरुणांच्या यशाच्या भुकेचा प्रतीक आहे. (Union Budget 2021-22: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी काँग्रेस पक्षाने केले ट्विट; सरकारला करुन दिली आव्हानांची जाणीव)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात 36 धावांवर ऑलआऊट झाल्यावर टीम इंडियाने अन्य सामन्यात जबरदस्त कमबॅक करत 2-1 अशी मालिका खिशात घातली. टीम इंडियाच्या मालिका विजयाच्या झुंझार कामगिरीचे जगभरात कौतुक करण्यात आले. टीम इंडियाच्या विजयात अनुभवी खेळाडूंशिवाय 6 युवा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. अनेक अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त होते आत नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला होता. एकूण परिस्थिती प्रतिकूल होती. या 6 पैकी 5 खेळाडूंनी मालिकेतून कसोटी पदार्पण करत पाठीशी कोणताही अनुभव नसताना बलाढ्य कांगारुंवर वर्चस्व गाजवले. शुभमन गिलने सलामीला येत संघाला चांगली सुरुवात करून दिली. गिलने या संपूर्ण मालिकेतील 6 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 257 धावा केल्या. या युवा फलंदाजाने ब्रिस्बेन टेस्टच्या निर्णायक सामन्यात 91 धावांची मोठी खेळी केली. त्यापूर्वी पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या जोडीने निर्णायक कामगिरी बजावली. दोघांच्या विक्रमी 123 धावांच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला.

दुसरीकडे, टी नटराजन आणि मोहम्मद सिजर यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. सिराजने मालिकेत सर्वाधिक 13 विकेट घेतल्या. नवदीप सैनीने तिसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण करत एकूण 4 विकेट्स घेतल्या, मात्र चौथ्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला विकेट घेण्यात यश आले नाही.