Navi Mumbai: नवी मुंबईकीत (Navi Mumbai) महापे येथील एका लॉजमध्ये बनावट नोटा (Fake Currency) छापणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने दोघांना ताब्यात घेतले आहे. गेले चार महिन्यांपासून ते महापे येथील कृष्णा पॅलेस लॉजमध्ये राहत होते. अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळताच, त्यांनी लॉजमध्ये छापा टाकला. दोघांची जीवनशैली चांगली व्हावी, या करिता त्यांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. अशी माहिती प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. (हेही वाचा-आटपाडी हादरली, जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार)
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक कुमार आणि अश्विनी विश्वनाथ सरवदे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. विवेक आणि अश्विनी हे दोघे गेल्या चार महिन्यांपासून कृष्णा पॅलेज लॉजमध्ये राहत होते. (FIU) फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, लॉजवर छापा टाकला. लॉजवरून अधिकाऱ्यांनी खोलीतून १३ मोबाईल फोन, स्कॅनर आणि प्रिंटर आणि लॅपटॉप जप्त केले.
दोघे जण गेल्या वर्षांपासून बेरोजगार होते. छाप्या दरम्यान अधिकाऱ्यांना लॅपटॉपमध्ये स्कॅन केलेल्या ५०० आणि १०० च्या भारतीय चलनाच्या नोटा आढळून आल्या. त्यांच्याकडे शाई आणि बॉंड पेपर होते. ज्यांचे ते प्रिंटआउट्स घेत असत. त्यांच्याकडे ७७,००० रुपयांची मूळ रोख आणि ८१,००० रुपयांच्या बनावट नोटाही होत्या. त्यांनी आता पर्यंत किती नोटा छापल्या, याचा तपास करत आहेत. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.