भारतातलं श्रीमंत देवस्थान Tirupati Balaji मंदिरामध्ये आता प्रसाद मिळणार कॉर्न स्टार्च पासून बनलेल्या बायोडिग्रेडिबल बॅग मधून!
तिरुपती बालाजी मंदिर (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतामधील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या तिरूपती बालाजी  (Tirupati Balaji) मंदिराने पर्यावरण पुरक एक मोठा निर्णय घेतला आहे. आता या मंदिरामध्ये भाविकांना प्रसाद प्लॅस्टिक बॅग ऐवजी बायोडिग्रेडिबल बॅगेमधून दिला जाणार आहे. मंदिर परिसरामध्ये लाडू प्रसादाच्या वाटपाच्या काऊंटर हा बायोडिग्रेडिबल बॅगचा पर्याय सुरू झाला आहे. 22 ऑगस्ट रविवार, रक्षाबंधनाच्या दिवशी DRDOचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केले आहे. दरम्यान या पर्यावरणपुरक बॅगा डीआरडिओ कडूनच बनवल्या जात आहेत.

हैदराबाद मध्ये अनेक शास्त्रज्ञ, संशोधक या बायोड्रिग्रेडिबल बॅग बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. सिंगल युज प्लॅस्टिक पासून दूर जाताना पर्यावरण पुरक पर्याय शोधण्यासाठी आता तयार करण्यात आलेली बॅग ही कॉर्न स्टार्च पासून बनवलेली आहे. 90 दिवसांनंतर ही बॅग आपोआप नष्ट होण्यास सुरूवात होते. प्राण्याच्या तोंडात जरी ही बॅग गेली तरी त्याचा काहीच दुष्परिणाम नसेल असे डीआरडीओच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. Ban on Single Use Plastic Items: देशात एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी.

बायोडिग्रेडिबल बॅग्स हा पर्यावरण पुरक पर्याय आहे. त्यामुळे मनुष्य जातीला देखील ती फायद्याची आहे. सध्या भाविकांचा प्रतिसाद पासून बायोडिग़्रेडिबल बॅग्स या अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातील असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सध्या प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपण आमंत्रण देत असल्याचं पहायला मिळालं आहे.