आज रात्री 12 वाजल्यापासून 14 तासांसाठी उपलब्ध नसणार पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची 'ही' सुविधा, जाणून घ्या कारण
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

भारतीय रिजर्व बँकेकडून नुकतीच अशी घोषणा करण्यात आली होती की, पैसे ट्रान्सफक करण्याची सुविधा रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ही रविवारी 14 तासांसाठी उपलब्ध नसणार आहे. केंद्रीय बँकांनी असे म्हटले आहे की, सिस्टिम अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान अपग्रेड केले जाणार आहे. त्याच कारणामुळे ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नसणार आहे. आरबीआयने सांगितले की,ही सुविधा 18 एप्रिल, रविवारी रात्री 12 am ते 2 pm दरम्यान उपलब्ध नसणार नाही आहे.(कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश) 

एका प्रेस प्रकाशनात आरबीआयने म्हटले की, आरटीजीएसच्या गुणवत्तेत वाढ करण्यासह आरटीजीएस सिस्टिम डिजास्टर रिकव्हरी टाइम अधिक उत्तम बनवण्यासाठी 17 एप्रिल 2021 रोजी कारभार बंद झाल्यानंतर आरटीएस मध्ये टेक्निकल अपग्रेडेशन केले जाणार आहे.(Health Insurance महागण्याची शक्यता, प्रीमियममध्ये सुद्धा झाली वाढ)

Tweet:

आरबीायने हे स्पष्ट केले आहे की, या दरम्यान नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर (NEFT) सुविधा आधीसारखीच सुरु राहणार आहे. याच पद्धतीने आरटीजीएस सुविधा रविवारी रात्री 00.00 वाजता ते 14.00 वाजताच्या कालावधीत कार्यरत नसणार असल्याचे सांगितले आहे. मात्र एनईफटीची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.(LIC कर्मचार्‍यांसाठी खूषखबर; 16% पगारवाढ, 5 दिवसांचा आठवडा ते 13,500 रूपयांपर्यंत Additional Allowance मिळणार)

आरटीजीएस ही सुविधा पैसे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते. ही सुविधा जवळजवळ एनईएफटी सारखीच असते. या सुविधेच्या माध्यमातून रियल टाइम मध्ये पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात अगदी सोप्प्या आणि सुरक्षित रुपात ट्रान्सफर केले जातात. आरटीजीएस खासकरुन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांचे मोठे उद्योग असून मोठ्या संख्येची रक्कम ट्रान्सफर करतात. आरटीजीएस सुविधेचा उपयोग कोणीही करु शकतो. ही सुविधा कमीतकमी दोन लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जात असून त्याच्या अधिकाधिक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीच मर्यादा नाही आहे.